करमाळा प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे नाभिक समाज मंदिर येथे संत सेना महाराजांची पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली आहे.
विवेकानंद मंदरतकर जामखेड येथील महाराज यांचे कीर्तन झाले आहे. 30 ऑगस्ट रोजी संत सेना महाराज यांची पुण्यतिथी होती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाभिक समाज बांधव संत सेना मंदिर गणेश नगर करमाळा येथे महाराजांची पुण्यतिथी प्रसंगी
महाराजांचे कीर्तन झाल्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात प्रसादाचा लाभ भक्तगणांनी घेतला होता. कार्यक्रमात समाज बांधव व इतर नागरीक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आ. संजयमामा शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भरतभाऊ आवताडे, जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार, जि. प. सदस्य दादा माळी, भाजपाचे दिग्विजय बागल, भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, सावंत गटाचे सुनील सावंत, शिवसेनेचे सुधाकर लावंड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष केशव चोपडे, राजेंद्र वाशिंबेकर आदी मान्यवरांनी मंदिर स्थळी भेट देऊन दर्शन घेतले तसेच आ. संजयमामा शिंदे यांनी संतसेना मंदीरास वीस लाख रुपये निधी मंजूर केला आहे असे सांगितले आहे. यावेळी अध्यक्ष नारायण पवार, जयंत दळवी, राजेंद्र जगताप, अनिल क्षिरसागर, हरीभाऊ कोकाटे, नवनाथ थोरात आदी समाज बांधवांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले होते. पूर्वी स्व. दिगंबररावजी बागल, मा. आमदार जयवंतराव जगताप, मा. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, गणेश चिवटे यांनीही निधी दिला होता.