
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील सर्व मंगल कार्यालयाचे चालक व मालकांनी एकत्र येऊन एकजूट दाखवून आपण सर्व एकत्र येऊन काम करून मंगल कार्यालय चालक मालकांना अडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे मत करमाळा मंगल कार्यालय चालक-मालक असोसिएशनचे मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांनी व्यक्त केले आहे. करमाळा तालुका मंगल कार्यालय

असोसिएशनची बैठक 29 ऑगस्ट रोजी ठीक चार वाजता धर्मसंगीत मंगल कार्यालय करमाळा येथे संपन्न झाली. या बैठकीला विविध विषयावर चर्चा होऊन करण्यात आली. यापुढे महिन्यातून एकदा तरी असोसिएशनची मीटिंग व्हायला हवी असे ठरले आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष विनोद चव्हाण, सचिव बाळासाहेब होसिंग, धर्मसंगीत मंगल कार्यालयाचे मालक विकास आवटे व धर्मराज आवटे, कमलाई लॉन्स व मंगल कार्यालयाचे मालक जयराम तात्या सोरटे, एकदंत मंगल कार्यालयाचे मालक महावीर टीकोरे, शिवशंभू मंगल कार्यालय हिवरे चे मालक विनोद शिंदे, समर्थ मंगल कार्यालय कुंभेज फाटाचे मालक प्रमोद जानकर, साईकृपा मंगल कार्यालय कंदरचे मालक अनिल मंगवडे, ज्योतिर्लिंग मंगल कार्यालय कुंभेज फाटा चे मालक अनिल काट्गे व तालुक्यातील मंगल कार्यालयाचे चालक व मालक व माही डेकोरेशनचे मालक मंगेश गोडसे उपस्थित होते.