
करमाळा प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या ११३ व्या जयंती निमित्त २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, कॅप्टन डॉ.विजया गायकवाड, महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षक, तालुका क्रीडा समन्वयक व सी. टी. ओ.प्रा.राम काळे, महाविद्यालयातील खेळाडू, एन.सी.सी. कॅडेट आणि विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
