
करमाळा प्रतिनिधी
किल्ला विभाग वार्ड क्र. ७ येथील नागरिकांनी व नगर पालिके समोरील बोळीतील नागरिकांनी तुंबलेल्या गटारी स्वच्छ व जुन्या झालेल्या गटारी नवीन करून देण्याबाबत नगरपालिकेत अर्ज केला आहे.

या अर्जात असे म्हटले आहे की, आम्ही सर्व अर्ज करीत आहोत की, नगर पालिके समोरील बोळीतील गटारी तुंबलेल्या आहेत त्या लवकरात लवकर स्वच्छ करून घ्याव्या व किल्ला विभाग वार्ड क्र. ७ येथील खूप जुण्या गटारी आहेत. जूनी गटार असल्यामुळे गटार पडलेली असल्यामुळे सांडपाणी वाहत नाही. सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. आमचे राहणीमान, आरोग्य धोक्यात आहे. सध्या साथीचे रोग पसरलेले आहे. तरी करमाळा नगर परिषद बांधकाम विभागणी परिस्थिती पाहून तातडीने नवीन गटार बांधणीचे प्रस्ताव मंजूर करून काम चालू करावे.

जयंत दळवी, महादेव यादव, प्रमोद पाटील, साजिद खान, रवी यादव, हर्षद मंत्री, अक्षय दळवी, नाना शिंदे, नसीर खान, विठ्ठल थोरात, सागर दळवी यांनी अर्ज केला आहे.