करमाळा प्रतिनिधी

मालवण येथे शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला अशी दुर्घटना भविष्यात घडू नये म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी करमाळा यांचे आंदोलन करणार असल्याचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) ता. अध्यक्ष भरत आवताडे यांनी तहसीलदार करमाळा यांना दिले आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला, हे अत्यंत वेदनादायी आहे. केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो, हे अनाकलनीय आहे. या प्रकरणात जे जे कोणी दोषी असतील त्यांच्याविरुद्ध अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी. या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करमाळा च्या वतीने आम्ही आंदोलन करत आहोत. सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युगपुरूष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा उभा रहावा.

निवेदन देताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार गट) ता. अध्यक्ष भरत आवताडे, युवक ता. अध्यक्ष किरण फुंदे, अजिंक्य पाटील, जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार, देवा लोंढे, आकाश आवताडे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *