करमाळा प्रतिनिधी

कुगाव ते शिरसोडी या इंदापूर यांना जोडणाऱ्या उजणी धरण बॅकवॉटरमध्ये लांब पुलाचे बांधकाम करणे या कार्यक्रमाचे भुमीपुजन शिरसोडी येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा सत्कार कुगाव ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आला. ग्रामपंचायतच्या वतीने युवा नेते सागर पोरे यांनी अजित दादा यांचे आभार मानले.

हा पुल पुणे सोलापूर जिल्ह्याला जोडणारा आहे. यामुळे इंदापूर तालुक्यातील आर्थिक उलाढालीत वाढ होणारं आहे. दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी दृष्टीने हा पुल महत्वपूर्ण ठरणार आहे. शिरसोडी व कुगाव या गावाला जोडणाऱ्या पुलासाठी तब्बल 395 कोटी 97 लाख 32 हजार रूपयाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पुलाची लांबी 1380 मिटर आसून त्यांवर वाहनांसाठी साडेसात मिटर रस्ता व दीड मिटर चे दोन पादचारी मार्ग असणार आहेत. दोन्ही तालुक्यांना जोडणारा पुल होत असताना त्याच बरोबर रस्ता देखील मोठा केला जाईल असे सूतोवाच दादा यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *