करमाळा प्रतिनिधी

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय, करमाळा येथील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.

या स्पर्धेत विद्यालयातील देवराज सतीश कन्हेरे (इयत्ता ७ वी), स्वराज सुनील पवार (इयत्ता ८ वी), शंभुराजे कन्हेरे, विराज पठारे व कृष्णा मेरूकर (इयत्ता १२ वी) या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत यश मिळविले. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक सचिन दळवे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन मा. आ. जयवंतराव जगताप, मा. नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, संस्थेचे विश्वस्त शंभुराजे जगताप, प्राचार्य अनिस बागवान, पर्यवेक्षक महेश कांबळे, पर्यवेक्षिका नवले मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुलाणी सर यांनी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *