करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काल करमाळा शहरातून MH 45 AH 7751 क्रमांकाची गाडी चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

सणासुदीच्या काळाचा फायदा घेत चोरट्यांकडून वाहन चोरीच्या घटना घडत असून, जणू काही चोरांचीच दिवाळी साजरी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या महिनाभरात करमाळा शहरातून तब्बल १० ते १५ वाहने चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी काही वाहने मिळाली असून, काही वाहनांचा अद्याप शोध लागलेला नाही.

वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिस प्रशासनाने या प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष देऊन चोरट्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

चोरांवर कारवाई झाली नाही तर छावा संघटना आक्रमक भूमिका घेणार, असा इशारा छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष राहुल जाधव पाटील यांनी दिला आहे. वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *