
करमाळा प्रतिनिधी
जेऊर ता.करमाळा येथील डॉ.विश्वजीत अनंत शिंगाडे व सत्यजित अनंत शिंगाडे या बंधूंनी जेऊर येथील बाजारपेठेत व्ही.एस्.मार्ट नावाने सुरू केलेल्या या भव्य मॉलचे उद्घाटन रक्षाबंधनाच्या मंगल मुहूर्तावर मोठ्या थाटात संपन्न झाले. जेऊर येथील इंदिरानगर भागामध्ये जेऊर-करमाळा मेनरोडवर सुरू करण्यात आलेल्या मॉलचे उद्घाटन लोकनेते माजी आमदार

नारायणआबा पाटील, तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.अर्जुनराव सरक, पं.स.चे उपसभापती पै.दत्ता सरडे, आदिनाथचे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, गणेश करे-पाटील, प्राचार्य डॉ.महेंद्र कदम, ॲड.संभाजीराव देवकाते, निसर्ग हॉटेल

सोलापूरचे मालक सनीभैय्या ठेंगील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सूर्यकांत गोफणे, नागपूरचे परिवहन आयुक्त राजेश सरक, ॲड.सुजित देवकते, पोलीस उपनिरीक्षक शंकरराव मेटकरी, प्रा.अशोक पाटील, प्रा.डॉ.अनिल साळुंखे, माजी आमदार नारायण पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मॉलच्या उद्घाटनानंतर पहिल्याच दिवशी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद लाभला विशेषता महिला ग्राहकांनी लक्षणीय खरेदी केली. प्राचार्य डॉ. अनंत शिंगाडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.