
करमाळा प्रतिनिधी
कुगाव ता. करमाळा ते शिरसोडी ता. इंदापूर पूलाचा विषय मार्गी लावण्यासंदर्भात सरपंच ग्रामपंचायत कुगाव पदी कार्यरत असताना पासूनच्या सातत्यपूर्ण केलेल्या सकारात्मक प्रयत्नास सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा इंदापूर चे

कर्तव्यदक्ष आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या पाठ पुराव्यामुळे यश मिळाले. पुलाबाबत अजितदादा पवार यांनी विधानसभेत मंजुरी दिली व अजितदादांच्या भक्कम पाठिंब्यातून बांधकाम विभागाने २८४ कोटी ५३ लाखाची ई निविदा काढली असुन ९०० दिवसात काम पुर्ण करण्याची अट टाकण्यात आली आहे. त्या कामाचे भूमीपूजन २३/०८/२०२४ रोजी होणार आहे. अशी माहिती कुगावचे मा. सरपंच तेजस्विनी दयानंद कोकरे यांनी दिली आहे.
