करमाळा प्रतिनिधी
लोकशिक्षिका लीलाताई दिवेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था करमाळा, शिक्षण विभाग पंचायत समिती करमाळा, इंग्लिश लँग्वेज टीचर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या इंग्रजी वक्तृत्व
स्पर्धेत घोटी येथील व साडे हायस्कूल साडे येथे इयत्ता सहावीत शिकणाऱ्या स्वरा प्रवीण कुलकर्णी हिने जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. याबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे. करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी
मनोज राऊत व करमाळा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी जयवंत नलावडे, यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे पाटील, इंग्लिश लँग्वेज टीचर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण लावंड सर व साडे हायस्कूलचे
इंग्रजी शिक्षक शंकर दिरगुळे सर यांनी स्वराला उत्तम संधी प्राप्त करून दिली याबद्दल त्यांचे आभार स्वराचे पालक प्रवीण कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थीही इंग्रजीवर उत्कृष्ट प्रभुत्व प्राप्त करू शकतात हे स्वराच्या उदाहरणावरून दिसून येते.