करमाळा प्रतिनिधी
जातेगाव येथे ग्रामस्थांच्या वतीने नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2022 मध्ये परीक्षा उत्तीर्ण झालेले जातेगावचे भाचे पोलीस उपनिरीक्षक PSI पदी निवड झालेले अमर मीनाक्षी वसंत ननवरे व प्रवीण शिंदे गुरुजी यांच्या पत्नी स्मिता प्रवीण
शिंदे यांची जातेगाव पोलीस पाटीलपदी निवड झाल्याबद्दल व सेवानिवृत्त पोलीस पाटील गोरख धुमाळ पाटील या सर्वांचा सत्कार समारंभ व भव्य मिरवणूक जातेगाव ग्रामस्थांच्या वतीने काढण्यात आली. हा कार्यक्रम श्री काळभैरवनाथ मंदिर येथे
संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तात्रय माने, प्रमुख पाहुणे रोहित चंद्रसेन शिंदे एपीआय करमाळा पोलीस स्टेशन, संदिपान अंकुश बनकर पीएसआय करमाळा पोलीस स्टेशन, सामाजिक कार्यकर्ते सुजित तात्या बागल, इंदापूर राष्ट्रवादी
ता.अध्यक्ष विजय दादा शिंदे हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे एपीआय शिंदे व पीएसआय बनकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. सुजित तात्या बागल, विजय दादा शिंदे यांनी ही आपले विचार व्यक्त केले केले. उपस्थिता मध्ये लक्ष्मण तात्या माने, काशिनाथ कामठे, मच्छिंद्र धुमाळ, यशवंत शिंदे, प्रकाश पाटील, सुभाष पवार, जातेगाव तंटामुक्त अध्यक्ष सुनील शिंदे, तुषार शिंदे सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, गावातील ग्रामस्थ युवक वर्ग, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी तात्यासाहेब शिंदे सर, रामकिसन धुमाळ सर, युसुफ शेख सर, रमेश वारे, भाऊसाहेब धुमाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी सर्व प्रमुख पाहुणे ग्रामस्थांना अल्पोपहार देऊन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव शिंदे गुरुजी यांनी केले तर सूत्रसंचालन घुले सर व आभार प्रवीण शिंदे गुरुजी यांनी आभार व्यक्त करताना गावामध्ये शांतता व सुव्यवस्था आबादीत ठेवण्यासाठी पोलीस पाटील पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले व कार्यक्रम संपन्न झाला.