करमाळा प्रतिनिधी
शेतकरी, कष्टकरी, मोलमजूर, दिव्यांग बांधव यांच्या न्याय हक्कासाठी मा.आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात संभाजीनगर येथे आक्रोश मोर्चा दि.९ ऑगस्ट २०२४ रोजी आयोजित केला होता. या मोर्चासाठी करमाळा, माढा व माळशिरस या तालुक्यातून ३०० वाहनांमधून जवळपास २००० कार्यकर्ते आज संभाजीनगर कडे रवाना होत असताना करमाळा बायपास रोड येथे आमदार संजयमामा शिंदे यांचे कडून या कार्यकर्त्यांसाठी नाष्टा व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
याप्रसंगी सुजित तात्या बागल,प्रहार संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील, करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, सोलापूर जिल्हा सरचिटणीस बापू नेते तळेकर, जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, युवा तालुका अध्यक्ष विकी मोरे, उपाध्यक्ष पप्पू ढवळे, सोमनाथ जाधव, महिला तालुकाध्यक्ष स्वातीताई गोरे, माढा तालुका अध्यक्ष अमोल केसरे, सोलापूर जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे, माळशिरस तालुका अध्यक्ष संजय पवळ, सोलापूर जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष संतोष पवार, जिल्हा सरचिटणीस श्रीपाद पाटील, युवा जिल्हा उपाध्यक्ष युनूस पठाण, सोलापूर जिल्हा संघटक दीपक नाईकनवरे, पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष मोरे उपस्थित होते.