करमाळा प्रतिनिधी

ही आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा… या केशवसुताच्या उक्तीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपल्या शाळेविषयी हृदयाच्या कोपऱ्यात एक सुखद आठवणींचा कप्पा जपून ठेवलेला असतो. पुन्हा एकदा त्या मनोहर आठवणी मार्च 2004 ssc च्या ग्रुपने दि. 15/5/2026 वार शुक्रवार रोजी जागविल्या.

या कार्यक्रमाचे आयोजन गिरधरदास देवी विद्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे अध्यक्ष कन्हैयालाल गिरधरदास देवी हे होते. त्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेली प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. त्यात कोणी सरकारी उच्चपद भुषवणारे तसेच व्यावसायिक, शेती, समाजकारण, राजकारणात आपला ठसा उमटवणारे सर्वांनी आपला संघर्ष, यशोगाथा व आपल्या अनुभवांचे आदान प्रदान केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना देवी म्हणाले की, आनंदी राहा, कोणतेही काम उत्साहाने व प्रामाणिकपणे करा, पैशांपेक्षा माणसे कमवा, समाजाची सेवा करा असा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेतील आठवणींना उजाळा दिला. शाळेतील शिक्षकांची शिस्त विद्यार्थ्यांविषयी तळमळ यामुळेच घडलो म्हणून शाळेचे ऋण व्यक्त केले. त्यावेळी त्यांचे वर्ग शिक्षक जगताप एस. एम. यांनी 22 वर्षांनी त्यांची हजेरी घेतली. शेवटी सर्वांनी स्नेहभजनाचा आनंद घेतला.

या कार्यक्रमासाठी प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका नीलिमा पुंडे तसेच विद्यमान मुख्याध्यापक संभाजी जगताप, नरतवडेकर जे. डी., रंदिल ए. जी., चिखले आर. के.,पवार डी. एच., फुलारी एस. बी., माने डी. पी. उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन करण्याकरिता अमोल ढवळे व स्वाती येडे व त्यांच्या सवंगड्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाकरिता 2003-04 इ. 10वी तील राहुल कानगुडे, अमोल बरडे, भालचंद्र गुळवे, शिवाजी इवरे, दत्तात्रय नाळे, धनाजी ढेरे, धनाजी पवार, बाळासाहेब सुरवसे, मीनाक्षी जाधव, सविता शिंगाडे, सुमित हसीजा, प्रेम चुंग, स्वाती येडे, विद्या माने, शुभांगी ढेरे हे उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *