करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील आळजापुर गावचे सुपुत्र निखिल तात्यासाहेब काळे यांची एस आर पी मध्ये निवड झाल्याबद्दल करमाळा माढा मतदारसंघाचे माआमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख
उपस्थिती करमाळा तालुक्याचे युवा नेते जेऊरगावचे कर्तव्यदक्ष सरपंच पैलवान पृथ्वीराज भैय्या पाटील, तात्यासाहेब काळे, परमेश्वर काळे, आळजापूरचे प्रगतिशील बागायतदार एनपी ग्रुप चे तालुका उपाध्यक्ष तात्यासाहेब काळे यांचे चिरंजीव आहेत.
कठीण प्रसंगातून सुद्धा तात्यासाहेब काळे यांनी आपली कन्या यांना उच्चशिक्षित केले. निखिल काळे यांना चांगले संस्कार घेऊन त्यांना सतत प्रोत्साहन देऊन त्यांना उच्चशिक्षित केले व देश सेवेमध्ये नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती. ती
निखिल काळे यांनी पूर्ण केली. करमाळा माढा मतदारसंघाचे मा. आमदार नारायण आबा पाटील यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. युवा नेते पृथ्वीराज भैय्या पाटील यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आळजापुर पंचक्रोशी मध्ये सर्वत्र त्यांचा कौतुक केलं जात आहे.