करमाळा प्रतिनिधी

कार्यकर्त्याचे असलेले प्रेम हीच माझ्या राजकीय जीवनाची शिदोरी असून भरतभाऊ आवताडे, ॲड. अजित विघ्ने यांना ‌पाठबळ देऊन योग्य संधी देऊन जनता जनार्दनाचे कल्याण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केले. करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची तालुका अध्यक्ष उद्योजक भरत भाऊ

अवताडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार संजय मामा शिंदे यांच्या करमाळा येथील संपर्क कार्यालयामध्ये भरत भाऊ अवताडे, ॲड. अजित विघ्ने यांचा मानाचा फेटा, हार, श्रीफळ देऊन तसेच केक कापून सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना आमदार संजय मामा शिंदे म्हणाले की, भरत भाऊ अवताडे यांनीही प्रतिकूल

परिस्थितीवर मात करत संघर्षमय जीवनातून यशस्वी वाटचाल करत यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. समाजकारणातून राजकारण करीत शिंदे गटाची पूर्व भागामध्ये ताकद वाढवण्याचे काम त्यांनी केले असून त्यांच्या कार्याची दखल भविष्यात नक्कीच घेऊन राजकारणात त्यांना योग्य संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य जनता

यांच्या हा विकासाचा केंद्रबिंदू मानून सर्वसामान्य जनतेची कामे करून ॲड. अजित विघ्ने यांनीही पश्चिम भागामध्ये शिंदे गटाची चांगली फळी उभारण्याचे काम केले आहे. त्यांचे सर्वसामान्यांची असलेले प्रेम समाजकारणातुन राजकारण करण्याची असलेली भूमिका नक्कीच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी यशदायी ही ठरणार आहे. भविष्यामध्ये त्यांनाही आपण योग्य राजकीय संधी देणार असल्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले. या ‌ सत्कार समारंभास सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत, सुजित तात्या बागल,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे, ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने,  सरपंच किरण फुंदे, डॉ. विकास वीर, दादासाहेब सावंत, भोसेचे माजी सरपंच भोजराज सुरवसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आशपाक जमादार, देवळाली मा. सरपंच आशिष गायकवाड, गौतम ढाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अजिंक्य पाटील, सोशल मीडिया प्रमुख राजेंद्र पवार,  बापू तांबे, सुरज ढेरे, अमोल चाळक,उदयसिंह पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *