
करमाळा प्रतिनिधी
मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात २२५ जणांनी रक्तदान केले. या शिबीराचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले. या प्रसंगी संत निरंकारी मंडळाचे सोलापूर झोनचे ज्ञानप्रचारक महादेव बिराजदार महाराज, क्षेत्रीय संचालक बाळासाहेब पवार, टेंभूर्णी ब्रँचमुखी अनिल पवार, खरेदी विक्रि संघाचे चेअरमन – शंभूराजे जगताप, कमलाई साखर कारखान्याचे चेअरमन विक्रम दादा शिंदे, दत्तकला शिक्षण संस्थेचे चेअरमन रामदास झोळ, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार, जि.प सोलापूरचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, सरपंच रविंद्र वळेकर, प्रमोद बदे, पत्रकार अशपाक सय्यद, दिनेश मडके आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ज्ञान प्रचारक महादेव बिराजदार महाराज व क्षेत्रीय संचालक बाळसाहेब पवार यांनी संत निरंकारी मंडळाच्या आध्यामिक व सामाजिक समाजोपयोगी मानवतावादी कार्याची माहिती दिली.

या शिबीरात रक्तसंकलनाचे काम बार्शी येथील रामभाई शहा रक्तपेढी, सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल, गोपाबाई दमाणी ब्लड बँक यांनी उत्कृष्टपणे केले.
अनेक मान्यवरांनी स्वतः रक्तदान करून संत निरंकारी मंडळाच्या मानवतावादी निष्काम कार्याचे कौतूक केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवादल अधिकारी रमेश वारे, भैरू वळेकर,वैशाली सरडे, मुकुंद साळूंके, अंगद पडवळे, बप्पा धडस, एकनाथ निमगीरे, मनधीर शिंदे तसेच सर्व महिला व पुरुष सेवादल यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल शिंदे यांनी केले तर सर्व रक्तदात्यांचे मान्यवरांचे व रक्तपेढीच्या सर्व डॉक्टरांचे आभार करमाळा ब्रँच मुखी पोपट थोरात यांनी मानले.
