करमाळा प्रतिनिधी

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली

असून या योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी केले आहे. करमाळा नगर परिषद हद्दीतील पात्र महिलांना ऑनलाईन अर्ज नोंदणीच्या मदतीसाठी करमाळा नगर परिषद, किल्ला विभाग, करमाळा

येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला असून सदर ठिकाणी पात्र महिलांनी भेट देऊन योजनेचा लाभ घ्यावा. त्या ठिकाणी योजनेची माहिती देऊन कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. तरी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी करमाळा शहरातील

२१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांनी सदर मदत केंद्रात भेट घेऊन निःशुल्क ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज भरावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करमाळा नगर परिषदेचे  मुख्याधिकारी तपसे यांनी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *