करमाळा प्रतिनिधी

आगामी करमाळा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे मी निवडणुकीत उभा राहणार आहे अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे मी तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रात अनेक कामे केली आहेत. यामुळे त्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेची सत्ता येणार आहे. करमाळा विधानसभेची जागा शिवसेनेची आहे.  पूर्वी अनेक

शिवसेनेचे आमदार या ठिकाणी निवडून आले आहे. यामुळे इथे शिवसेनेचाच उमेदवार असणार आहे आता लवकरच करमाळा तालुक्यात दौरा करणार आहे. नागरिकांच्या अडीअडचणी समजून भविष्यात सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी दिली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *