
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांना करमाळा तालुक्यातील उजनीकाठच्या गावांच्या अडचणी सांगून उजनी वरील जलवाहतूक सुरु करण्याबद्दल चर्चा करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना फोन करून लॉन्च वाल्यांना मार्गदर्शन

करुण लॉन्च चालू करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी यांचे मनापासून धन्यवाद व आभारी आहे त्या कामाचे आभार मानण्यासाठी मामांचा निमगाव येथे आज सत्कार करण्यात आला आहे. त्या महत्त्वाच्या कामाबद्दल सर्व करमाळा व इंदापूर

तालुक्याच्या नागरिकांच्या वतीने मामांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कुगांव जगदंबा दूध संस्थेचे चेअरमन सचिन गावडे, युवा नेते गौतम बोंद्रे, सचिन भोईटे, अझरुद्दीन सय्यद, महेश हवलदार, आजिनाथ मारकड, दादा पोरे, हनुमंत

गायकवाड, बत्तास पोरे, निलेश अवघडे, सुभाष भोसले, अजित चव्हाण, नानासाहेब भोसले, नितीन भोसले, संपत मदने, विठ्ठल हवलदार हे सर्वजण उपस्थित होते.