करमाळा प्रतिनिधी

करमाळ्यामध्ये लवकरच ओबीसी बांधवांचा मेळावा घेणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.

सध्या महाराष्ट्रात ओबीसी समाज भयभीत झाला आहे. समाज अनेक अडचणीत आला आहे. गोरगरीब समाज बांधवांना जगणे मुश्किल झाले आहे. मुला-मुलींचे शिक्षण घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे. ओबीसी

आरक्षण बचाव समिती निर्माण करून लवकरच याबाबत चर्चा विनिमय करण्यासाठी समाज बांधवांना बोलवून मेळावा घेणार आहे. बैठकीचे नियोजन करणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *