
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्रातील अवघ्या संतांच्या दिंड्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जातात परंतु करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी येथील श्री संत रघुराज महाराज यांच्या भेटीसाठी आषाढी गुरुपौर्णिमेला प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा बिटरगावी येऊन द्वारके वरचा काला संपन्न करतात अशी आख्यायिका आहे. येणारे 21 जुलै रोजी हजारो भाविक दिंड्या घेऊन येऊन श्रीक्षेत्र बिटरगाव येथे गुरुवर्य रामभाऊ महाराज निंबाळकर बाप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होतो. परिसरातील भाविक हजारो भाकरी घेऊन काल्याचा महाप्रसाद करतात.

