जेआरडी माझा
विररत्न, नरविर शिवबा काशीद यांच्या बलीदान दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन समाजातील मान्यवरांच्या हस्ते व ऊपस्थीत करण्यात आले. यावेळी राष्टीय नाभिक संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर यांनी बोलताना इतीहासाला पुन्हा ऊजाळा दिला.
एका दिवसासाठी राजा व्हायला पण थोर भाग्य लागते. आपण मारले जाणार, कापले जाणार हे माहिती असतांना सुद्धा विररत्न शिवाजी काशीद यांनी स्वराज्यासाठी हसत हसत मरण पत्कारले. “‘लाख मेले तरी चालतील परंतू लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे” हाच स्वराज्य वाढविण्याचा उद्देश समोर ठेवून अनेक मावळ्यांनी शिवरायांसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या मावळ्यापैकी एक प्रति शिवाजी महाराज शिवाजी काशीद शिवाजीराजेंसाठी मी हजार वेळा मरायला तयार आहे, शिवाजीराजे कोणाला सापडणार नाहीत असे म्हणत सिद्दी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यातून राजेंना सुखरूप बाहेर पडायला मदत करत आपल्या प्राणाची आहुती देणार्या विररत्न शिवाजी काशीद यांचा आज पुण्यस्मरण दिन अशी माहिती दिली.
या वेळी वेताळवाडीचे मा.सरपंच रामभाऊ राऊत, पोपट गाडेकर, संतोष गाडेकर, विनोद गायकवाड, संजय महाराज गाडेकर, लखन मासाळ, गणेश काळे, बिटुभई तांबोळी, वैजिनाथ राऊत यांचे सह नाभिक समाज बांधव ऊपस्थीत होते.