करमाळा प्रतिनिधी

सोगाव ता.करमाळा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मा.संचालक कैलास पाखरे यांनी श्री.मकाई सह. साखर कारखान्याचे मा. चेअरमन दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली बागल गटाच्या कार्यकर्ता मेळाव्याला गावपातळीवर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.युवा नेते दिग्विजय बागल सर्व मतभेत विसरुन दुरावलेल्या सर्व

सहकार्यांना विधानसभा निवडणुकीपर्यंत सोबत घेणार असल्याचा निर्धार मेळाव्याप्रसंगी करत आहेत.यापूर्वी वीट येथील मेळाव्यात पोंधवडी गावचे युवा नेते अमोल गाडे यांनी तर सालसे येथील तानाजी लोकरे सर यांनी केतूर येथील मेळाव्यात जाहीर प्रवेश केला आहे.यावेळी श्री.मकाई सह.साखर कारखाना चेअरमन दिनेश

भांडवलकर,ज्येष्ठ संचालक बाळासाहेब भाऊ पांढरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. उपसभापती चिंतामणी दादा जगताप,सतीश नीळ,रेवन्नाथ निकत,गणेश झोळ,बापू चोरमले,संतोष पाटील,बाळासाहेब सरडे,स्वप्निल गोडगे,आशिष गायकवाड,अजित झांजूर्ने, रामभाऊ हाके,साधना खरात, कल्याण सरडे,काशीनाथ काकडे,देवा ढेरे,युवराज रोकडे,गणेश तळेकर,डाँ विजय रोकडे आदी पदाधिकारी व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बागल गटात असंख्य कार्यकर्ते करणार प्रवेश.

श्री.चिंतामणी दादा जगताप*. करमाळा तालुक्यातील गावपातळीवरील विरोधी गटातले अनेक प्रमुख कार्यकर्ते रश्मी दिदि बागल व युवा नेते दिग्विजय बागल यांच्या संपर्कात असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बागल गटात प्रवेश करणार आहेत. बागल गटाच्या विचाराला मानणारे परंतु काही कारणाने दुरावलेले असे सर्व हितचिंतक रश्मी दीदी बागल. दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रिटेवाडी उपसा सिंचन योजना,एमआयडीसी,मांगी तलाव,केम वडशिवने उपसा सिंचन, सीना कोळगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांना पर्यायी जमीन वाटप होणे,उजनी जलाशयावरील पूल,आरोग्य,रस्ते, वीज अशा विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी करमाळा तालुक्यातील मातब्बर मंडळी प्रवेश करणार असल्याची माहिती कृषि उत्पन्न बाजार समिती मा.उपसभापती चिंतामणी जगताप यांनी दिली

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *