
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरामध्ये सन १९८० सालापासून बेघर आणि गरीब रहिवाशांनी करमाळा नगर परिषद हद्दीमध्ये झोपड्या बांधून राहत आहेत त्यांना नगरपालिकेने पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन जोडणी दिलेली आहे तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने वीज जोडणी दिलेली आहे. गेली 40 वर्षापासून करमाळा शहरात सुमंत नगर झोपडपट्टी, सिद्धार्थ नगर झोपडपट्टी, संभाजीनगर झोपडपट्टी, फंड गल्ली, सॉ मील शेजारील झोपडपट्टी, जामखेड रोड झोपडपट्टी, मोहल्ला गल्ली झोपडपट्टी, चांदगुंड गल्ली झोपडपट्टी, यल्लमा मंदिर

झोपडपट्टी, मौलाली नगर झोपडपट्टी, रंभापुरा झोपडपट्टी व इतर करमाळा शहरातील लहान लहान झोपडपट्ट्यांमध्ये सर्व जाती-धर्माचे बेघर लोक झोपडी बांधून राहत आहेत. या झोपड्यांना बरेच दिवस झाले असल्यामुळे ते आता सध्या राहण्यायोग्य राहिले नाहीत. तरी येत्या पावसाळ्यामध्ये झोपड्या पडून जीवित हानी होण्याची शक्यता आहे. तरी महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभाग शासन निर्णय क्रमांक ०८१०/प्र.क्र. ९६/२०१८ झोपसु १ मंत्रालय मुंबई दि १६ मे २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्व झोपडपट्टी धारकांना महाराष्ट्र शासन झोपडपट्टी क्षेत्र निर्मूलन व पुनर्वसन

अधिनियम 1971 मधील तरंगतीनुसार झोपडपट्टी धारकांना झोपडपट्टी आहे त्या ठिकाणाची जागा त्यांच्या नावे करून सिटीसर्वे ला त्यांची नोंद करून त्या ठिकाणी घरकुल मंजूर करून झोपडपट्टी क्षेत्र निर्मूलन व पुनर्वसन करावे. मी झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन हा विषय गेल्या एक वर्षांपूर्वी आमदार नारायण आबा पाटील यांनी घेतलेल्या आम सभेमध्ये हा विषय मांडला होता. त्यावेळेस आमदार नारायण आबा पाटील यांनी नगरपालिकेचे सी ओ तपसे यांना आदेश देऊन सुद्धा झोपडपट्टी निर्मूलन या विषयात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केलेला आहे. तरी मी जिल्हाधिकारी यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीने आवाहन करतो की

जिल्हाधिकारी यांनी नगरपालिकेचे सी ओ यांना त्वरित आदेश देऊन करमाळा शहरातील सर्व झोपडपट्ट्यांचे पंचनामे व मोजमापे करून तसे अहवाल प्रांत अधिकारी यांना देऊन लवकरात लवकर करमाळा शहरातील सर्व ठिकाणची झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन करण्याचे काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत जर करमाळा नगरपालिकेचे सीईओ यांनी दिनांक 12/ 5/ 2026 पर्यंत झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन संदर्भात कामकाजास सुरुवात नाही केली तर दिनांक 13/ 5/ 2026 रोजी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करमाळा नगरपरिषद कार्यालयासमोर चक्री उपोषण व घंटानाद आंदोलन करण्यात येईल याची दक्षता घ्यावी व इथून पुढे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
