सोलापूर दि.5 (जिमाका):- राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्ये मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सोलापूर जिल्ह्याचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

        शनिवार, दिनांक 06 जुलै रोजी सकाळी 07.15 वा.शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव.  सकाळी 08.50 वा.शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने प्रयाण व अनुसयाबाई रामचंद्र बुर्ला महिला महाविद्यालय, राजेंद्र चौक, येथे सकाळी 09.00 वा. विद्यार्थीनींचा कृतज्ञता मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.15 वा. वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय,कडे प्रयाण व स.10.30 वा.जिल्हा नियोजन आराखड्याबाबत विभाग प्रमुखांची आढावा बैठकीस उपस्थिती.

        दुपारी 12.40 वा. वाहनाने सेटलमेंट ग्राऊंड, सेटलमेंट एरिया,कडे प्रयाण व 01.00 वाजता महिलांचा कृतज्ञता मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.15 वा.शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव व दुपारी 03.00 वाजता पंढरपूर कडे प्रयाण. दुपारी 04.30 कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे आगमन व पंढरपूर आषाढी यात्रा-2024 नियोजनाबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. 

  सायं. 06.00 वा.पंढरपूर देवस्थान येथे आगमन व श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी राखीव. सायं. 06.15 वा. यात्री निवास, पंढरपूर येथील निवासाची पाहणी. सायं. 06.30 वा.दर्शनवारी पत्राशेडची पाहणी व सायं.06.45 वा. पंढरपूर येथून वाहनाने पुणे कडे प्रयाण.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *