करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील केम गावामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध डेअरी चेअरमनला दुग्ध अभिषेक करून गायला 40 रुपये भाव मिळावा यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले.

अनुदानापासून वंचित असणाऱ्या हजारो दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित अनुदान जमा करावे, तसेच चालू दुध शासन निर्णया प्रमाणे 34 रुपये दराने खरेदी करण्यात यावे.

महाराष्ट्राचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 3.5/8.5 दुधाला 34 रू दर जाहिर केला होता, तसा शासन निर्णय दि 26 जुन 2023 रोजी काढण्यात आला. परंतु अनेक खाजगी संस्थांनी शेतकऱ्यांकडून 26 रु 27 रुपया ने दुध खरेदी केलं आहे. 3.5/8.5 ला नको सर्व कंपनी वाले snf फॅट डिफरन्स 1 रू ठेवतात त्यामुळें 26 ते 27 रू दर मिळतो 3.2 फॅट व 8.3 snf या दुधाला कोणत्याही अटी शर्ती न लावता अनुदान सहित 40 रू दर मिळावा त्या शेतकर्यांना 1 जुलै 2023 ते 10 जानेवारी 2024 पर्यंत फरक बिले देण्यात यावेत.

अनुदान सर्व दुध उत्पादकांना मिळाले पाहिजे, ज्या संस्थांकडून हे अनुदान देण्यात येणार नाही त्यांच्यावरती कारवाई करावी.

दुध उत्पादकांना एक तर कुठल्याही प्रकारच्या अटी शर्ती न घालता 5 रु अनुदान तरी द्यावे अन्यथा शासन निर्णया नुसार दुधाला 40 रु दर देण्यात यावा.

कारण पशुखाद्य, औषधे, चारा व पूरक आहाराचे दर सातत्याने वाढत आहेत. दुधाचा उत्पादन खर्च यामुळे मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. प्रादेशिक दुग्धविकास अधिकारी सतीश देशमुख यांनी माहितीच्या अधिकाराखालील प्रश्नाला उत्तर देताना दुधाचा प्रति लिटर सरासरी उत्पादन खर्च ४२.३३ रुपये येतो असे सांगितले आहे. तरी देखील आम्हाला 34 रुपये दर भेटत नाही आणि आपण मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाही. बघ्याची भुमिका घेतली जातेय.

अनेक वेळा निवेदन देऊन देखील कोणतीही उपाययोजना केलेली नाही जर 10 दिवसात कोणतीही प्रकारचा दिलासा नाही दिल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस बापू नेते तळेकर, प्रहार तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अरुण लोंढे चेअरमन, कालिदास तळेकर, माऊली बीचीतकर,सचिन बिचीतकर,नागनाथ मंगवडे, सतिश देवकर,निलेश गुटाल,गोकुळ तळेकर, सोमनाथ तळेकर,सतीश खानट,राहुल तळेकर व इतर दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *