
करमाळा प्रतिनिधी
जेऊर ता. करमाळा येथील हर्षद किसन बोटे यांचा गृह विभागासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेत न्यायवैद्यक प्रयोगशाळेत सह्यक वैज्ञानिक पदावर निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. हर्षल हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक किसन बोटे यांचे चिरंजीव असून लहानपणापासून विविध स्पर्धा परीक्षा देण्याचा त्यांना छंद होता. पाचवी मध्ये

असतानाच दिलेल्या परीक्षेत पास होऊन जवाहर नवोदय विद्यालयात माध्यमिक शिक्षणासाठी त्यांची निवड झाली. त्यांचे माध्यमिक शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर मोहोळ येथे, उच्च माध्यमिक शिक्षण शिवाजी महाविद्यालय बार्शी तर शास्त्र शाखा पदवीचे शिक्षण वि.गु.शिवदारे कॉलेज सोलापूर येथे झाले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून पी.एच.डी करत असतानाच दिलेल्या शासनाच्या गृह विभागासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या

वतीने घेण्यात आलेल्या न्यायवैद्यक प्रयोगशाळा संचनालयात सहाय्यक वैज्ञानिक या पदावर त्यांची निवड झाली. प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा करमाळा तालुका निसर्गमित्र परिवाराच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक पाथरूडकर यांनी केली तर आभार प्रविण बोटे यांनी मानले. या कार्यक्रमाला पक्षी मित्र कल्याणराव साळूंके, केंद्रप्रमुख भारत पांडव,किसन बोटे, मंडलाधिकारी संतोष गोसावी, गजेंद्र पोळ,शेटफळचे सरपंच पांडुरंग लबडे, विकास गुंड, राजेंद्र साबळे, पांडुरंग नाईकनवरे, संतोष दराणे, रेखा साळूंके-शिंदे, जयश्री दराणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.