
करमाळा प्रतिनिधी
करमाळा विधानसभा मतदार बंधु-भगिनींनो मी डॉ. अरूण दिगंबर अडसूळ करमाळ्याचाच असून, माझे शिक्षण करमाळा, अकलूज, बार्शी, कोल्हापूर आणि पुणे येथून पूर्ण केले. त्यानंतर, शिक्षणक्षेत्रात माध्यमिक शिक्षक, उच्च-माध्यमिक प्राध्यापक, तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक, कुलसचिव, प्रकुलगुरू आणि कुलगुरु या पदांवर SPPU मधे कार्य केले. बारमतीच्या विद्याप्रतिष्ठानमधेही प्राचार्य पदावर तब्बल १५ वर्षे काम पाहिले.

त्याबरोबरच MPSC सदस्य, देशाच्या नियोजन मंडळातील एका उपसमितीवरही सदस्य म्हणून भूमिका निभावली. आजमितीला मी पुण्यातील भारतीय शिक्षण संस्था आणि जन शिक्षण संस्था या संस्धांवर अध्यक्ष पदांवर कार्यरत आहे.

माझ्या शिक्षणक्षेत्रातील वरील कामांच्या फायदा आपल्या महाराष्ट्र राज्याला व्हावा या हेतुने मी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत विचार करीत आहे. करमाळा मतदार संघाच्या अनेक सकारात्मक आणि व्यवहार्य योजनांचा आभ्यासपूर्ण आरखडा तर डोक्यात आहेच. त्याचा देखावा-वजा उहापोह करण्याची ही वेळ नाही याचेही भान आहे. आपण सर्वांनी मला फक्त एकच संधी देण्याविषयी मी आपणास विनंती करणार आहे. करमाळ्याचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान महाराष्ट्रात निर्माण करणे “आपण सर्वांनी” मनावर घेतले तर सहज शक्य आहे. अनेक पदांवर पारदर्शी काम केल्यामूळे कुठल्याच पदाची अपेक्षा नाही पण आजही उमेद/क्षमता असल्यामुळे अधिकारपदावरून अनुभवाधारीत काम करण्याची आंतरिक इच्छा आपणापुढे व्यक्त करीत आहे. आपल्या तालूक्याच्या नावलौकिकासाठी संधी द्याल हीच अपेक्षा.
