
करमाळा प्रतिनिधी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९९ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष व सकल धनगर समाजाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करमाळा के. हाईट्स येथे करण्यात आले होते. यावेळी राजमाता अहिल्याबाई होळकर

यांच्या प्रतीमा पूजन, रक्तदान शिबीर व चौंडी येथे जाणाऱ्या अनुयायांस दिवसभर थंड पाणी व शरबत वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन साहित्यिका कवी प्रा.अंजली श्रीवास्तव, डॉ.सुनिता

दोशी, स्त्रीरोग तज्ञ डॉ.कविता कांबळे,भावना गांधी,पंचायत समिती मा.सभापती भाग्यश्री खटके,पोथरे माजी सरपंच संगीताताई खराडे, रासप ता.अध्यक्ष शारदा सुतार, हिवरवाडी सरपंच अनिता पवार, पाथर्डी सरपंच रुक्मिणी मोटे, विहाळ

सरपंच पूजा मारकड,रोशेवाडी सरपंच नंदा धायतोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन संपन्न झाले. त्याच प्रसंगी रक्तदान व शरबत वाटपाचे उद्घाटन बाजार समितीचे माजी सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर, शेतकरी कामगार नेते दशरथ कांबळे, दत्तकला शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ, व्य. संघटनेचे मा.अध्यक्ष नाथराव शिंदे, अ.भा.नाभिक संघटनेचे अध्यक्ष नारायण तात्या पवार, भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकूर,रा.काँ.शहराध्यक्ष शिवराज जगताप, ऍड. नानासाहेब शिंदे, भाजप जिल्हा सरचिटणीस श्याम सिंधी, दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, बौद्धाचार्य सावहारी कांबळे, भिमदल अध्यक्ष सुनील भोसले, पोथरे सरपंच अंकुश शिंदे, विजयकुंमार नागवडे, संतोष कुलकर्णी, टीव्ही नाईनचे पत्रकार शितलकुमार मोटे, पत्रकार हर्षवर्धन गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी उपस्थितीत मान्यवरांचे स्वागत सन्मान धनगर धर्म पिठाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब टकले, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, इंजि. आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम बंडगर, रासप तालुका अध्यक्ष जिवन होगले, इंजि प्रविण होगले, इंजि.हर्षल कोळेकर, सुहास ओहळ, संपर्क प्रमुख विकास मेरगळ यांनी केले.
यावेळी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या इतिहासातील कार्याविषयी साहित्यिका अंजली श्रीवास्तव, डॉ. सुनिता दोशी, दशरथ अण्णा कांबळे, शिवाजी बंडगर, प्रा.रामदास झोळ, ऍड.नाना शिंदे, प्रा.श्रीकांत दरगुडे, समाधान कोळेकर इत्यादींची भाषणे झाली. यावेळी डॉ.सुनिता दोशी म्हणाल्या की, लोकमाता अहिल्याबाई होळकर सर्वधर्म, समभाव, अस्पृश्ता, सामाजिक एकात्मता, स्त्री पुरुष, गोरगरिबांना दिनदूबळ्या विषयी कळवळा, हुंडा बंदी, उच्चाटन, अनिष्ट चालीरीती रूढी परंपरांचा बिमोड, मूल दत्तक वारसाहक्क, प्रजेविषयी तळमळ, असलेल्या माता, महेश्वर या ठिकाणी आणून कारागीर, मजूर, विणकर, कलावंत, साहित्यिक, गुणी लोकांच्या विकासासाठी जमीन, संपत्ती दान दिल्या, राज्यात पशुपक्षीं ना चरण्यासाठी कुरणे राखली,मुंग्यांना साखर, माश्यांना कणकेचा गोळा, वाटसरूंना पिण्यासाठी पाणपोया, हिवाळ्यात गरजूंना गरम कपडे, आपल्या राज्यात सूक्ष्म जीवही उपाशी राहू नयेत यासाठी दक्षता असलेल्या दूरदृष्टी वादी, अनेक गरीब लोकांचे पुनर्वसन केले. गोरगरिबांसाठी अन्नछत्रे चालविली. वस्त्रांचे वाटप केले. प्रवाशी मार्गावर वृक्षारोपण विश्रांतीसाठी ओटे व धर्मशाळा बांधल्या. अशा कितीतरी समाजसुधारकांचे कृतिशील कार्य करणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर होऊन गेल्या यांचा आदर्श आपण आत्मसयला हवा असे वक्तव्य जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी डॉ.दोशी यांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ.अशोक शेळके, प्रा.गंगाधर वाघमोडे, प्रा चंद्रकांत खताळ, पै.सुशील नरूटे, एसआयडी सतीश हजारे,डॉ समाधान कोळेकर, प्रा.भारत माने, पत्रकार विष्णू बिचुकले, अंजनडोहचे सरपंच अरुण शेळके, भाऊसाहेब धुमाळ, पाराजी शिंदे, पै. सुरेश शिंदे,संदीप खटके, आ.सह.माजी संचालक विठ्ठल भाऊ शिंदे, सतीश मोटे, धायखिंडीचे माजी सरपंच महादेव वायकुळे, भागवत वाघमोडे, पप्पू मारकड, सचिन शेळके सर, रावसाहेब शिंदे, रावसाहेब पाटील, सुरेश शिंदे, नितीन देवकते सर, बाळासाहेब वाघमोडे सर, उद्योजक विजयकुमार सोलंनकर, उद्योजक सतिश रूपनवर, माऊली हिंगसे, व्यसनमुक्तीचे जनक रामभाऊ वाघमोडे, धनंजय वाघमोडे, विशाल वाघमोडे, विष्णू वाघमोडे, सुंदर लांडगे,आबा टकले, शहाजी शिंदे,विक्रम धायतोंडे, आजिनाथ वायकुळे, विठ्ठल भिसे, विठ्ठल खांडेकर, रोशेवाडीचे पाटील शिवाजी पवार, छगन लगस, नितीन दामोदरे, बापू शिरगिरे,परमेश्वर पोले, शरद घरबुडे, नितीन लगस, सचिन सामसे, शंकर सुळ, संभाजी खताळ, समाधान कोपनर, दिपक कडू इत्यादी सह प्रचंड जनसमुदयात राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
………….
करमाळा बायपास के हाईट्स येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 299 व्या आयोजित जयंती कार्यक्रम प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले, विधान परिषदचे आमदार भाजप नेते गोपीचंद पडळकर, करमाळा विधानसभा आमदार संजय मामा शिंदे, आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव गाडे, मनसेचे तालुकाध्यक्ष बापू घोलप,शहाजी ठोसर,आ.सह.सा.का. व्हाईस चेअरमन रमेश आण्णा कांबळे, व्याख्याते यशवंत भाऊ गायकवाड, सुजित बागल,आशिष गायकवाड, भोजराज सुर्वे, उमेश पोळ, शहाजी झिंजाडे सह अनेक मान्यवरांनी भेटी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दर्शन घेतले.