करमाळा प्रतिनिधी

दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, करमाळा आणि विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती व बहुउद्देशीय सामाजिक संस्था रजि. करमाळा यांचे  संयुक्त विद्यमाने करमाळा शहरामध्ये आज

गुरुवार दिनांक 23/05/2024 रोजी महाकारूणीक: तथागत: भगवान बुद्धांची 2568 वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली. प्रथम: त्यागमुर्ती माता रमाई बुद्ध विहार सिद्धार्थ नगर या ठिकाणी तथागत: भगवान बुद्ध आणि बोधिसत्व:

प.पु. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप व धूप प्रज्वलित करून सामुदायिक बुद्ध वंदना उपस्थित सर्वांच्या वतीने घेण्यात आली. तसेच, बुध्दगया (बिहार) येथून बुद्ध दर्शन घेऊन आलेल्या कविता शिंदे यांनी

धम्मरथामधील तथागत: भगवान बुद्ध यांच्या पवित्र मंगलमय प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून धम्मरॅलीस सुरूवात करण्यात आली. आणि बुध्दगया येथून आणलेली धम्मशॅल प्रशांत लिंबराज कांबळे यांना भेट म्हणून देण्यात आली. तसेच करमाळा शहरातील प्रमुख मार्गामधून ही धम्मरॅलीची सवाद्य मिरवणूक निघाली राष्ट्रपिता: महात्मा ज्योतिराव फुले पुतळा,

बोधिसत्व: प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुतळा यांना धम्मरॅली मार्गामधून पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. या धम्मरॅली मिरवणूकीचे खास आकर्षण होते ते म्हणजे सिद्धार्थ नगर येथील रमेश भारत कांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली असलेला “भिमकन्या टिपरी आणि लेझीम संघ” यांनी शहरातील प्रमुख चौका, चौकामध्ये टिपरी आणि लेझीम पथकाचे कार्यक्रम दाखवून उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांकडून कौतुकास्पद वाहवाह मिळविण्यात आली. तसेच दुसरे महत्वपूर्ण आकर्षण होते ते करमाळा जनतेचे नगरसेवक जयकुमार कांबळे आणि माजी नगरसेविका सविताताई जयकुमार कांबळे यांची भिमकन्या संस्कृती जयकुमार कांबळे यांनीही प्रमुख चौका, चौकामध्ये तलवारबाजी आणि डबल काठी यांचे प्रात्यक्षिक करून दाखवून कौतुकास्पद कार्यक्रम संपन्न केला. त्याचबरोबर भिमराव (फकिरा) दिलीप कांबळे यांचा बाल कराटे आणि नाॅनचॅक चॅम्पियन:बौद्ध रामजी भिमराव कांबळे या बाल कलाकारानेही प्रत्येक चौकामध्ये डबल काठीचे प्रात्यक्षिक दाखवून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले व या सर्वांनी या धम्मरॅलीची शोभा वाढविली. या धम्मरॅलीमध्ये विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती व बहुउद्देशीय सामाजिक संस्था रजि. करमाळा मधील सर्व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, उपाध्यक्ष नागेश दादा कांबळे, खजिनदार रमेश अण्णा कांबळे, सचिव लक्ष्मणरावजी भोसले, सदस्य राजू आव्हाड, मुकुंद कांबळे, श्रीनिवास कांबळे तसेच भारतीय बौद्ध महासभेतील सर्व केंद्रीय शिक्षक, शिक्षीका,बौद्धाचार्य,  तालुक्यातील सर्व कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांसह प्रमुख कार्यकर्ते, विविध राजकीय, शैक्षणिक, सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील सर्व उपासक-उपासिका, तसेच त्यागमुर्ती माता रमाई बुद्ध विहार सिद्धार्थ नगर मधील सर्व बौद्ध उपासक व उपासिका तसेच भीम नगर, सिद्धार्थ नगर, सुमंत नगर, आण्णाभाऊ साठे नगर मधील सर्व बौद्ध व बहुजन समाजातील बांधवांनी तसेच लहान मुले, मुली यांनी धम्मरॅलीत सहभागी होऊन या धम्मरॅलीची शोभा वाढविण्याचे मोलाचे योगदान दिले आहे. त्याचबरोबर, ता.उपाध्यक्ष महाराजा शंकर कांबळे, सरचिटणीस भिमराव सावळा कांबळे सर, ता.खजिनदार प्रमोद शंकरराव गायकवाड, करमाळा-भिमाई ग्रूपचे अध्यक्ष जयकुमार रामदास कांबळे, रमेश भारत कांबळे, सचिव भाऊनाना कांबळे यांनी या तथागत भगवान बुद्ध जयंती आणि धम्मरॅलीचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. हा संपूर्ण कार्यक्रम करमाळा ता.अध्यक्ष केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य प्रशांत लिंबराज कांबळे गुरूजी यांच्या नेतृत्वाखालील आणि मार्गदर्शनानुसार संपन्न करण्यात आला. शेवटी भारतीय बौद्ध महासभेचे सचिव गायकवाड, जोगदंड (जेऊर-केडगाव) यांनी धम्मरॅलीत सहभागी झालेल्या उपस्थितांचे आभार प्रदर्शन करून 9 वा.30 मि. निघालेल्या बुद्ध जयंतीच्या धम्मरॅलीचा बरोबर 1 वाजता नियमानुसार सांगता समार॔भ करण्यात आला. तसेच सर्व  भारतीयांना या बुद्ध जयंतीच्या पवित्र मंगलमय हार्दिक त्रिवार शुभेच्छा !!! नमो बुद्धाय ! जय भीम !! जय संविधान !!!.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *