करमाळा प्रतिनिधी

          दिनांक 21 मे 2024 रोजी सायंकाळी झालेल्या वादळात कुगाव ता. करमाळा ते काळाशी ता. इंदापूर कडे प्रवासी घेऊन जलवाहतूक करणाऱ्या बोटीला अपघात झाल्याने 6 प्रवासी बेपत्ता होते तर 1 सुखरूप किनाऱ्यावरती पोहोचलेला होता. या दुर्घटनेतील 5 मृतदेह आज दिनांक 23 मे 2024 रोजी सकाळी शोधकार्य करणाऱ्या पथकाला सापडले. सदर मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचे चिरंजीव व निमगाव टे चे सरपंच यशवंतभैय्या संजयमामा शिंदे यांनी संबंधित डॉक्टर यांच्याशी संवाद साधून सदर मृतदेह कमीत कमी वेळात पोस्टमार्टम करून नातेवाईकांच्या ताब्यात द्या अशा सूचना दिल्या.

याप्रसंगी उपस्थित तहसीलदार शिल्पा ठोकडे, प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्याशी त्यांनी संवाद साधला. दुर्घटनेतील  कुटुंबीयांना शासनाकडून योग्य ती मदत मिळावी यासाठीचे प्रस्ताव ताबडतोब पाठवावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

              काल दिनांक 22 मे रोजी रोजी रावगाव येथे वीज पडून जयदीप बापू पवार या 17 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला होता. सदर पवार कुटुंबीयांनाही यशवंतभैय्या शिंदे यांनी आज सांत्वन्पर भेट दिली. शासन स्तरावरून या कुटुंबीयांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करून यांना मदत मिळवून देऊ असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.

……………………

नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये – आ.संजयमामा शिंदे.

निसर्ग कुणाच्याही हातात नाही. पाठीमागील दोन-तीन दिवसात झालेल्या वादळामुळे शेती पिकांचे विशेषतःकेळी बागांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून त्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. कुगाव येथील बोट दुर्घटना, रायगाव येथील वीज दुर्घटना या दोन्ही दुर्घटनेतील कुटुंबीयांच्या पाठीशी लोकप्रतिनिधी या नात्याने मी उभा असून त्यांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे फळबाग पिकांसह इतर पिकांचे जे नुकसान अवकाळी पावसामुळे झाले आहे. त्यांनाही मदत मिळवून देण्यासाठीही आपण प्रयत्न करणार आहोत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *