करमाळा प्रतिनिधी

           करमाळा शहरातील गेल्या अनेक दिवसापासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून करमाळा शहरातील नागरिक विशेषता महिला वर्गांचा रोष वाढला असून या पार्श्वभूमीवर करमाळा नगर परिषदेचे नगरसेवक संजय सावंत,

पाणीपुरवठा अधिकारी फिरोज शेख, फारुक जमादार, मार्तंड सुरवसे, राजेंद्र वीर, पांडुरंग सावंत, आदी जणांनी दहिगाव पंपिंग स्टेशन येथे जाऊन सर्व वस्तुस्थिती जाणून घेतली. उजनी धरणातील पाणी खाली गेल्यामुळे तसेच दुबार पंपिंग करून

पाणीपुरवठा करमाळा शहरासाठी करत असून यामध्ये अनेक अडचणी येत यामध्ये विद्युत पुरवठा पूर्ण दाबाने होत नसून तसेच दुपार पंपिंग करणारे मोटारीला उजनी धरणातील जाळ्या येऊन अडकत असल्यामुळे दुबार पंपिंग करणारे मोटारी बंद

पडत आहे त्यामुळे करमाळा शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. तसेच या ठिकाणी कायम कर्मचारी नसल्यामुळे संपूर्ण जबाबदारी ठेकेदाराकडून पुरवण्यात येणाऱ्या मजुरांकडे आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी शासनाने त्वरित भरावी अशी मागणी यावेळी नगरसेवक संजय सावंत यांनी केले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *