करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुका सह. खरेदी विक्री संघाचे विद्यमान संचालक सर्जेराव (आप्पा) घरबुडवे (वय ८४ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी आमदार देशभक्त

कै. नामदेवराव जगताप यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून ते संपूर्ण तालुक्यात परिचित होते. त्यांनी शेवटपर्यंत जगताप गटाची साथ सोडली नाही. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून त्यांनी काम पहिले. मिरगव्हण ग्रामपंचायतीचे

सरपंचपदी व विकासे सोसायटीच्या चेअरमन पदी तब्बल २५ वर्षे इतका प्रदीर्घ काळ ते कार्यरत होते. त्यांचे निधनाबद्दल माजी आमदार जयवंतराव जगताप, युवानेते शंभूराजे जगताप यांनी शोक व्यक्त केला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *