
करमाळा प्रतिनिधी
विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात इयत्ता अकरावी कला, वाणिज्य व विज्ञान वर्गाचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये कला शाखेचा निकाल 96.86%, वाणिज्य शाखेचा निकाल 97.30%, विज्ञान शाखेचा निकाल

100 लागलेला असून यामध्ये कला शाखेत प्रथम आलेली विद्यार्थी पुढील प्रमाणे गोरे पूजा राजेंद्र 93.17%, आवटे स्नेहल भाऊ 86.67%, चव्हाण समृद्धी नितीन 82.50%, वाणिज्य शाखेतील प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे वासाणी मानसी हेतल

94.83%, साळुंके सायली दत्तात्रय 93.00%, ढवळे आदिती दत्तात्रेय 92.67%, विज्ञान शाखेतील प्रथम तीन क्रमांक पुढीलप्रमाणे घोगरे प्रांजली नितीन 97.67%, नायकलवाडीया मजुषा सोमला 96.33%, कोंढलकर भक्ती सतीश 95.83% अशा

सर्वच शाखेत विद्यार्थिनींनी बाजी मारुन इ. ११वी वर्गामध्ये घवघवीत हे संपादन केलेले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहांमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक हे उपस्थित होते. याप्रसंगी घोगरे प्रांजली नितीन व साळुंखे सायली दत्तात्रय यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी. पाटील यांनी आपल्या मनोगटातून विदयार्थीनी आपल्या ज्ञानातुन जास्तीत जास्त लोकांचे कल्याण व्हावे. जीवनात शिक्षण खुप महत्त्वाचे आहे असे सांगितले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातून संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांनी सांगितले की, स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करणे आवश्यक आहे. कष्टा शिवाय जीवनात यशस्वी होणे शक्य नाही असे सांगितले. या सत्कार समारंभ प्रसंगी सर्व शाखेतील प्रथम तीन विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.व्ही.ऐ. वारुळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.एम.डी. जाधव यांनी केले तर आभार प्रा. मुक्ता काटवटे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी इयत्ता 11 वी कला, वाणिज्य व विज्ञान वर्गातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.