
करमाळा प्रतिनिधी
माढा लोकसभा मतदारसंघात विविध विकास कामे पूर्ण करणार असल्याची माहिती अपक्ष उमेदवार विनोद सीतापुरे यांनी दिली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील सहा गावे वंचित आहे. विविध ग्रामीण भागात वीज, पाणी व रस्ते असे विकास कामे प्रलंबित आहेत. गावागावात सामान्य नागरिकांना भेटून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहे. त्यांच्या दळणवळणासाठी

भविष्यात आवश्यक ते सहकार्य करणार आहे. या ग्रामीण भागाला मोठमोठ्या नेत्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्या लोकांसाठी मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशा वंचित लोकांना व त्यांच्या गावातील रखडलेले कामे पूर्ण करणार यासाठी माढा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी मला निवडून द्यावे असे अपक्ष उमेदवार विनोद सीतापुरे यांनी सांगितले आहे.
