करमाळा प्रतिनिधी
एक रुपयात पिक विमा योजना त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस असल्यामुळे शेती पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले. महाराष्ट्र सरकारने प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये पीक नुकसान
भरपाई मंजूर करून ती रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत आहे. शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळेच सरकारने नुकसान भरपाई दिली म्हणजे शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले हा सरकारी पुरावा असताना एक रुपया विमा भरून
घेणाऱ्या विमा कंपनीने शेतकऱ्याला मंजूर करणे आवश्यक असताना मंजूर केला नाही. शेतकरी खूप संकटात आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे पिक विमा त्वरित मंजूर करावा अशी
मागणी नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकारने एक नुकसान भरपाई मंजूर केली म्हणजे पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले हे सिद्ध झाले आहे मग पिक विमा कंपनी ने आज पर्यंत शेतकऱ्यांचा पिक
विमा मंजूर का केला नाही ? महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याचा पिक विमा ची रक्कम कंपनीकडे भरली आहे मग विमा कंपनी अद्याप पर्यंत पिक विमा मंजूर का करत नाही ? शेतकऱ्यांना पीक विमा तात्काळ मंजूर करण्याचे आदेश सरकारने तात्काळ द्यावेत अन्यथा शेतकऱ्याला वतीने आंदोलन करावे लागेल असा इशारा हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक व नेरले तालुका करमाळा ग्रामपंचायत माजी सरपंच औदुंबरराजे भोसले यांनी दिला आहे