सोलापूर दि.24 (जिमाका) :-  लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने  निवडणूक कालावधीत  आचारसंहितेचे प्रभावी  अंमलबजावणी सह कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. तसेच जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करून त्यात

अवैद्य बाबी किंवा रक्कम आढळून आल्यास योग्य कारवाई करण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथकाची स्थापना करण्यात आली आहे. टेंभूर्णी (भीमानगर) ता. माढा येथे   स्थिर सर्वेक्षण पथकाकडून सुमारे एक लाख एकोनपन्नास हजार पाचशे रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

          दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी टेंभूर्णी (भीमानगर) ता. माढा या ठिकाणी फॉर्च्युनर  (एमएच 04 एफव्ही 8666) गाडीच्या डिक्कीत रोख रक्कम  दिसून आली. सदर रोख रकमेबाबत वाहनचालक रमेश शिवराम चव्हाण (रा. दिवा, जि. ठाणे)

यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणताही पुरवा आढळला नसल्याने सदर रकमेचा पंचनामा करण्यात आला. यामध्ये 500 रुपयाच्या नोटाचे तीन बंडल मिळुन आले सदर बंडलची मोजणी केली असता 500 रुपयाच्या 299 नोटा असे एकूण  एक

लाख एकोनपन्नास हजार पाचशे मिळून आले. सदर रक्कम टेंभूर्णी पोलीस स्टेशन येथे सुपूर्त करण्यात आली आहे. ही कारवाई पथक  प्रमुख जयवंत नलावडे व  पोलीस उपनिरिक्षक कुलदिप सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *