करमाळा प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर व तहसील कार्यालय करमाळा आणि ग्रामपंचायत गौंडरे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर,
महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. एल. बी. पाटील सर, उपप्राचार्य संभाजी किर्दाख सर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मौजे गौंडरे गावामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 100% मतदान करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केलेला. या गावात रामनवमीपासून
हनुमान जयंती पर्यंत अखंड हरिनाम सप्त्याचे आयोजन करण्यात आले. या सप्तात्याच्या सांगता समारंभ प्रसंगी करमाळा तालुक्याच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाच्या
मताचे मोल अनमोल असते. यासाठी सर्व ग्रामस्थांनी शंभर टक्के मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा असे आव्हान असे आव्हान केले.
यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांनी दोन्ही हात वर करून मतदान करण्याचे अभिवचन दिले. या लोकशाहीच्या उत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण गावात स्वच्छता अभियान, मतदान जनजागृती व्याख्याने यांच्या माध्यमातून ग्रामस्थांचे प्रबोधन केले जाणार आहे. तसेच मतदानादिवशी प्रत्येक कुटुंब लोकशाहीची गुढी उभारून लोकशाहीचा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. या ठिकाणचे मतदान केंद्र ही आदर्श मतदान केंद्र निर्माण केले जाणार आहे तसेच यावेळी गावातील ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, पोलीस पाटील, वसुंधरा अभियानाचे सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.