करमाळा प्रतिनिधी

करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेच्या वतीने जेष्ठ पत्रकार राजा माने कार्य गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात प्रथमच डिजिटल मिडियाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या नावाने आदर्श कार्य गौरव पुरस्कार करमाळा डिजिटल पत्रकार संघाने सुरू केला असून पत्रकारिता क्षेत्रातील गुरुवर्य राजा माने यांच्या प्रति असलेला प्रेमाचा हा अनमोल ठेवा असणार आहे.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असून लेखणीच्या माध्यमातून समाजाची अविरत सेवा करणाऱ्या पत्रकार बांधवाचा करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना करमाळा यांच्यावतीने शनिवारी २७ एप्रिलला सकाळी १० ते २ या वेळेमध्ये तपश्री प्रतिष्ठान संचलित दिव्यरत्न गुरु गणेश गोपालन संस्था, नगर रोड करमाळा याठिकाणी जेष्ठ पत्रकार राजा माने कार्य गौरव पुरस्काराने सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा ट्रॉफी सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने उपस्थित राहणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, मुख्याधिकारी सचिन तपसे, डिजिटल मिडियाचे राज्य उपाध्यक्ष सतिश सावंत, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रविण नागणे, राज्य संघटक संघटक मुरलीधर चव्हाण, प्रदेश सदस्य संतोष सुर्यवंशी, राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले, जिल्हा उपाध्यक्ष विजय कोरे, बार्शी तालुकाध्यक्ष धीरज शेळके, दिनेश मेटकरी, कुंदन हुलावळे, आदी उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामा बद्दल श्रेणिकशेठ खाटेर यांना जीवन गौरव पुरस्कार, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामा बद्दल प्रा. रामदास झोळ, युवा आयकॉन म्हणून महेश निकत, तालुका आयकॉन आणि युवानेते म्हणून ॲड. अजित विघ्ने, आदर्श शिक्षक म्हणून भीष्माचार्य चांदणे यांचा ज्येष्ठ पत्रकार राजा माने कार्य गौरव पुरस्कार 2024 सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर करमाळा तालुक्यातील पत्रकार बांधवांचा ट्राॕफी आणि सन्मानपत्र देऊन आदर्श पत्रकार म्हणून गौरव करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डिजिटल मिडीयाचे करमाळा तालुकाध्यक्ष दिनेश मडके उपाध्यक्ष शितलकुमार मोटे, गौरव मोरे, सचिव नरेंद्रसिंह ठाकूर, सहसचिव प्रज्योत गांधी, खजिनदार सचिन हिरडे, संघटक राजाराम माने, ज्ञानदेव काकडे, संपर्कप्रमुख अशोक मुरुमकर, व्यवस्थापक सुर्यकांत होनप, प्रसिद्धीप्रमुख अंगद भांडवलकर, राहुल रामदासी, नितीन झिंजाडे, सिद्धार्थ वाघमारे, हर्षवर्धन गाडे, सागर गायकवाड, युवराज जगताप, धनंजय पाटील, आदीजण परिश्रम घेत असुन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले‌ आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *