करमाळा प्रतिनिधी

विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील वरिष्ठ विभागातील मराठी विषयाचे विभागप्रमुख प्रा.प्रदिप मोहिते यांचा निरोप समारंभ 01/04/2024 रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहामध्ये संपन्न

झाला. या प्रसंगी संस्थेचे सचिव विलासरावजी घुमरे (सर), संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी. पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक व सर्व मान्यवरांच्या हस्ते

महाविद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने प्रा.प्रदिप मोहिते यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभ प्रसंगी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, प्रा.मोहिते सर हे बहुआयामी

व्यक्तिमत्व असून कोणत्याही क्षेत्रात अतिशय नैपुण्यपणे काम करण्याची त्यांची तयारी असते. असे विचार मांडले. विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय टेंभूर्णीचे प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांनी मोहिते सरांनी लिहीते झाले पाहिजे असे मत व्यक्त केले. डॉ. कवी

राजेंद्र दास मनोगतातून प्रा. मोहिते सर यांना पीएच.डी. करण्यापेक्षा आपले विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी लिहीणं गरजेच आहे असे मत व्यक्त केले. यावेळी तहसीलदार सुषमा पैकेकरी मॅडम, सामाजिक कार्यकर्ते प्रमोदजी झिंजाडे, मोहिते

सरांचे गुरु किलकिले सर,  प्रा. संगिता मोहिते-पैकेकरी, मदार चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश बदर या मान्यवरांनी मनोगते व्यक्त केले व मोहिते सरांच्या आठवणीना उजाळा दिला. या सत्कार समारंभ प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रा. मोहिते सरांविषयीचे आपले विचार व्यक्त केले. त्याचबरोबर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी यांनी प्रा.मोहिते सरांविषयीचे आपले विचार व्यक्त केले. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांनी ही मोहिते सरांविषयीचे व्यक्त केले. मनोगतातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील यांनी प्रा. मोहिते सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या सत्कारास उत्तर देताना प्रा. मोहिते यांनी मी सर्वांचा आदर्श असलो तरी माझे आदर्श विलासराव घुमरे सर आहेत असे उद्‌गार काढून महाविद्यालय व संस्थेविषयी ऋण व्यक्त केले. महाविद्यालयामध्ये व विदयार्थ्यांमध्ये मोहीते सर बाबा या नावाने परिचीत आहेत. या कार्यक्रमासाठी यशवंत परिवारातील सर्व प्राध्यापक, सर्व कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, त्याचबरोबर प्रा.मोहिते सर यांचे दिवे, सासवड गावचे पोलिस पाटील, वर्गमित्र व गावकरी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *