
करमाळा प्रतिनिधी
उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे आज दि.14/3/2024 रोजी मा. ज़िल्हा शल्यचिकित्सक डॉ. सु0 ते 18 वर्षे या वयोगटातील मुलांसाठी हृदयरोग शिबिरहास माने सर आणि निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉ. कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली, आदित्य बिर्ला हॉस्पिटल पुणे, बालाजी हॉस्पिटल मुंबई आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम करमाळा टीम

यांच्या संयुक्त विद्यमाने 0 ते 18 वर्षे या वयोगटातील मुलांसाठी हृदयरोग शिबिर(2 D Echo Camp) घेण्यात आले. या मध्ये बाल हृदयरोग तज्ञ डॉ. भूषण चव्हाण सर यांनी 49 लाभार्थ्यांची 2 D Echo तपासणी केली. त्यापैकी 10 जणांना हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगण्यात आले. 2 रुग्ण शस्त्रक्रियेसाठी हायर सेंटर ला संदर्भित केले असून,5 जणांना follow up सांगितले आहे .

तसेच आदित्य बिर्ला हॉस्पिटल पुणे येथील डॉ. जंगम OMF सर्जन यांनी 42 लाभार्थ्यांची तपासणी केली असून त्यातील Tongue tie 16, Cleft palate 4, Cleft lip 1, Bone graft 2,
Speech therepy 3 चे रुग्ण आढळून आले असून त्यांना आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे संदर्भित करण्यात आले.

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.गजानन गुंजकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
रुग्णालयाच्या RBSK टीम यांच्या माध्यमातुन अंगणवाडी मार्फत होणाऱ्या कामामधून ज्या मुलांना आरोग्यविषयक समस्या असतील त्या मुलांचे आरोग्य विषयक या समस्येवर निदान व उपचार घेण्यासाठी या शिबिराचे किती महत्त्व आहे. हे डॉ.गजानन गुंजकर सरांनी सर्वांना पटवून दिले. शिबिरासाठी जमलेले पालक व लहान मुले यांच्या मनातून आजाराबाबत

तसेच त्याच्या उपचाराबाबत योग्य व शास्त्रिय माहिती देऊन त्यांच्या मनातील असणारी भीती दूर केली व जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा असे सर्वांना आवाहन केले.
या शिबिरासाठी आदित्य बिर्ला हॉस्पिटल पुणे येथून डॉ. जंगम सर (OMF सर्जन) तसेच त्यांची टीम व बालाजी हॉस्पिटल मुंबई येथील डॉ. सुभाष चव्हाण सर (हृदयरोगतज्ञ, बालरोग) व त्यांची टीम हे उपस्थित होते.

करमाळा येथील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे डॉ. अश्विनी वाघमारे, डॉ. संकेत सावंत, डॉ. आसमा इनामदार, डॉ. दिप्ती जाधव, श्सुनील धांडे, राहुल अंधारे, सारिका चव्हाण, संगीता विभुते तसेच उपज़िल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होतें..

आजच्या शिबिराच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपजिल्हा रुग्णालयाचे आयसीटीसी समुपदेशक कपिल भालेराव यांनी केले.
तसेच शेवटी सुहास आगलावे यांनी मान्यवरांचे आभार मानले.