करमाळा प्रतिनिधी

करमाळा पुणे या हायवे रस्त्यावर असलेल्या रोशेवाडी येथे स्पीड ब्रेकर बसावा यासाठी युवासेना  (ठाकरे गट ) उपजिल्हाप्रमुख मयुर यादव यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले.

        निवेदनात युवासेनेकडुन नमुद करण्यात आले की, करमाळा पुणे रस्ता हायवे झाल्याने या रस्त्यावरुन भरधाव वेगात वाहने ये जा करत आहेत त्यामुळे या रस्त्यावर असलेल्या रोशेवाडी येथे दर एक दोन दिवसाला अपघात होत असून अनेक जणांना गंभीर दुखापत झाली आहे. शाळकरी मुलांना देखील याची इजा पोहचलेली आहे .

     सदर रस्त्यावर तात्काळ स्पीड ब्रेकर बसवल्यास अपघात टळू शकतात. त्यामुळे तात्काळ स्पीड ब्रेकर बसवून होणारे अपघात टाळावेत  या उपर बांधकाम विभागाकडून दूर्लक्ष झाल्यास होणाऱ्या अपघाताची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम

विभागाची राहिल असा इशारा युवासेनेकडुन देण्यात आला.

या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे, शहरप्रमुख समीर हालवाई, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर,  उपशहरप्रमुख कल्पेश राक्षे, आदित्य जाधव, डॉ सौरभ थोरात  उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *