
केम प्रतिनिधी
श्री उत्तरेश्वर विद्यालय केम येथे सन १९९३-९४ चा माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेली तीस वर्षानंतर मित्र मैत्रिणींची भेट व एक आदर्श जीवन घडविणाऱ्या शिक्षकांचे पुन्हा एकदा मार्गदर्शन व गेल्या अनेक दिवसापासून

वेध लागलेल्या क्षणाचे भागीदार होऊन केम येथे एक अनोखा ऐतिहासिक भूतकाळातील आठवणींना उजाळा देत मेळावा संपन्न झाला. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्या गुरुजनांचे औक्षण करून पुष्प वृष्टी करुन स्वागत करण्यात आले.

दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. गुरुजनाऺना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सन्मानित केले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती, शाळेचे मुख्याध्यापक व स्टॉप यांचा सत्कार समारंभ यावेळी करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत

अर्चना बिचीतकर, मनीषा गावडे, सुवर्णा चौरे, उज्वला मोरे, उषा बोंगाणे, रोहिणी नकाते, वंदना थिटे, अर्चना यादव, चंद्रकला नागणे, रोहिणी कामटे, विजयादेवी शिंदे, हेमलता मांजरे, कांचन सरडे, नंदा तळेकर, शोभा बिचीतकर, कामिनी बोंगाणे, मनीषा

ढेकळे, यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर कार्यक्रमाची रूपरेषा सुहास वेदपाठक, प्रकाश माईनकर व नागनाथ काळे यांनी स्टेजवर सांगितली. सूत्रसंचालन विकास क्षीरसागर, हनुमंत काळे यांनी तर पांडुरंग मस्के, तानाजी तळेकर, नवनाथ देडगे,

संतोष लोंढे, कांतीलाल पन्हाळकर, वैजनाथ कदम, परमेश्वर राऊत, गणेश वाघ, प्रकाश माईनकर यांनी आपले अनुभव सांगितले तर एकदम सुंदर फोटोग्राफी व प्रसिद्धी माध्यम म्हणून ज्ञानेश्वर गुरव व राहुल रामदासी यांनी काम पाहिले तर

सर्वांच्या मनोरंजनासाठी विकास लोहार यांनी पुण्यावरून आपली गायन टीम आनून कार्यक्रमास रंग भरला तर सोमेश्वर कुर्डे, धनंजय ताकमोगे, सुनील दौंड, अनिल गुटाळ, सुनील गुटाळ, श्रीरंग मस्के, बाळकृष्ण शेंडगे, रघुनाथ तळेकर, संजय लेंडे, संजय काळोखे, स्वानंद थिटे, मारुती देवकर, सुंदरदास बिचीतकर, गणेश वाघ, नीरज गाडे, भगवान सुरवसे, अनिल पठाडे, श्रीहरी गुडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योग्य असे नियोजन केले. यावेळी माजी विद्यार्थी संजय पाटील, अनिल भिल्ल, पोपट हरदाडे, उत्तरेश्वर पोकळे व इतर विद्यार्थी काही कामानिमित्त हजर नसले तरी कार्यक्रमाला प्रत्यक्ष फोनवरून हजेरी लावली. कार्यक्रमाचे आभार विकास क्षीरसागर, सुहास वेदपाठक व रोहिणी कामटे यांनी मानले.