करमाळा प्रतिनिधी

रिटेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच लता किशोर रिटे यांचे त्या चाळीसगावातील सरपंच व सदस्यांना आवाहन.

रिटेवाडी ता. करमाळा येथे शुक्रवार दि. ८ मार्च रोजी सांयकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आलेल्या महाप्रबोधन कार्यक्रमासाठी रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी प्रयत्न करणाऱ्या त्या चाळीसगावच्या सरपंचांनी आपल्या सर्व सदस्यासह

व कार्यकर्त्यांसह कार्यक्रमाला उपस्थित राहावे. जेथून रिटेवाडी उपसा सिंचन योजना कार्यान्वित होणार आहे ते गाव आणि ते ठिकाण बघावे असं आवाहन रिटेवाडीच्या लोकनियुक्त सरपंच लता किशोर रिटे यांनी केले आहे. सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियाशी संवाद साधताना सरपंच लता किशोर रिटे म्हणाल्या की, रिटेवाडी गावाला गेली ४० वर्षे हक्काचा

पोहोचरस्ता नव्हता. आता हेच गाव करमाळा तालुक्यातील इतर गावांना प्रबोधनाचा हमरस्ता दाखवण्याचे काम करीत आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने होत असलेल्या महाप्रबोधन या कार्यक्रमासाठी रिटेवाडीकरांनी भव्य नियोजन केलेले असून भव्य स्टेज, शेकडो चार चाकी गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था, ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीची व्यवस्था, हजारो खुर्च्यांची बैठक

व्यवस्था असे नियोजन केलेले आहे. रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सध्या करमाळा तालुक्यात आणि महाराष्ट्रामध्ये रिटेवाडी हे गाव गाजत आहे. उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीची घोषणा सरकारने जर केली नाही तर लोकसभेच्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकू अशा पद्धतीची भूमिका रिटेवाडी उपसा सिंचनच्या नियोजित लाभधारक

गावातील लोकांनी आणि सरपंचांनी घेतलेली आहे. या निमित्ताने रिटेवाडीची प्रथम नागरिक व या कार्यक्रमाचे संयोजन करणाऱ्या गावाची लोकनियुक्त सरपंच म्हणून त्या चाळीस गावातील सरपंच आणि सदस्यांना मी आवाहन करते की, त्यांनी किमान करमाळा तालुक्याच्या नकाशावर हे रिटेवाडी गाव कुठे आहे ? आपली उपसा सिंचन योजना कुठून कार्यरत होणार आहे

? ते बघण्यासाठीचा महाशिवरात्री हा अत्यंत उत्तम योग असून या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आणि रिटेवाडी चे ग्रामदैवत भैरवनाथाच्या मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने या गावाला भेट दिली तर ही योजना कार्यान्वित होण्यासाठीचे एक चांगलं पाऊल त्यांनी टाकलं किंवा शुभारंभ केला असं होईल.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *