करमाळा प्रतिनिधी

कंदर ता. करमाळा येथील मनोज रोकडे यांची शिवसेना तालुका उपप्रमुखपदी निवड केली आहे. शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत, करमाळा तालुकाप्रमुख देवानंद बागल यांनी रोकडे यांना बुधवारी करमाळा येथे झालेल्या कार्यक्रमात निवडीचे पत्र दिले आहे.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षवाढीसाठी तळागाळात जाऊन पक्षाचे ध्येयधोरणे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाचा लोकांसमोर लेखाजोखा मांडावा असे आवाहन तालुकाप्रमुख देवानंद बागल यांनी नियुक्ती करताना केले.

पक्षाची ताकत वाढवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे निवडीनंतर मनोज रोकडे म्हणाले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *