
करमाळा प्रतिनिधी
आमदार संजय मामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा नगरपरिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक एक व दोन मधील विकास कामाला सुरुवात झाली असून यामध्ये मोहल्ला गल्ली येथील विविध

परिसरात गटार बांधकाम करणे, गणेश बोरा घर ते पिंटू बेग घर रस्ता डांबरीकरण करणे व गटार बांधकाम करणे, सावंत गल्ली येथील सार्वजनिक शौचालय परिसर सुशोभित करणे या कामाची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती माजी नगरसेवक संजय सावंत यांनी दिली. सदर कामास सुरुवात करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.





