
करमाळा प्रतिनिधी
मकाई सहकारी साखर कारखान्याचे 2022 – 23 चे गळीत हंगामातील उसाचे बिल अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही म्हणून बहुजन संघर्षनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी रस्ता रोको मोर्चे अशी विविध आंदोलने केली परंतु मकाई सहकारी साखर कारखान्याचे उसाचे बिल शेतकऱ्यांना मिळालेले नाही.

भविष्यात शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र करणार असल्याचे प्रशासनाला समजल्याने दस्तूर खुद्द जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सहीने पत्र बहुजन संघर्षनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांना देण्यात आले.

सदर पत्रामध्ये सुचित करण्यात आले आहे की, मकाई सहकारी साखर कारखान्याला बँकेकडून लोन मंजूर होण्याची प्रक्रिया सुरू असल्याने आपण कुठल्याही पद्धतीची आंदोलने करू नयेत जेणेकरून लोन मंजूर होण्यास बाधा निर्माण होईल.

जिल्हाधिकारी यांच्या पत्राचा आदर करून बहुजन संघर्ष सेना फेब्रुवारी महिना संपेपर्यंत गप्प बसेल मात्र मार्च महिन्यामध्ये आंदोलनाचे हत्यार उपसेलअसे बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनीं सांगितले.
सध्या संपूर्ण करमाळा तालुक्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्राची चर्चा तालुका भर सुरू आहे.

