
करमाळा प्रतिनिधी
22 जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामलल्ला ची भव्यदिव्य प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. या सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत. प्रभू श्रीराम मंदिराची ओढ भक्तांना लागल्याने प्रभू श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकासाठी अयोध्या धाम श्रीराम मंदिराच्या दर्शनासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. 20 डब्याची 1440 प्रवासी संख्या असणारी विशेष रेल्वे 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:00 वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून सुटेल सायंकाळी 9 वाजता नगर येथून मनमाड मार्गे निघेल. दिनांक 15 फेब्रुवारी रोजी दुपारी श्री अयोध्या धाम येथे पोहोचेल. निवास व्यवस्था

कारसेवापुरम येथे असेल. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.
16 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर विशेष रेल्वे मनमाड दौंड पुणे मार्गे कोल्हापूर साठी निघेल व दिनांक 18 तारखेला पुणे व कोल्हापूर येथे पोहोचेल.

अयोध्या धाम येथे होणार्या दर्शनासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रचनेतून करमाळा येथून सात जणांची निवड करण्यात आली आहे,
प्रमोद फंड, अनंत मसलेकर, संघर्ष दयाळ,विश्वजीत निंबाळकर,शुभम रोकडे, विनोद इंदलकर,भुजंग गोरे

वरील सात जणांना अयोध्या धाम येतील होणाऱ्या दर्शनासाठी विशेष पास ची सोय केली आहे. त्यांची जाण्याची सोय दौंड येथून करण्यात आली आहे.
