करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून शिवसेना संपर्क प्रमुख व जिल्हयाचे आधारवड प्रा. शिवाजी सावंत सर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख प्रियंका गायकवाड यांनी महिलांच्या हस्ते महादेवाची महाआरती केली आहे. यावेळी गायकवाड यांनी सांगितले की,  महाराष्ट्र राज्याला एकनाथ शिंदे यांच्या सारखे

संवेदनशील मुख्यमंत्री लाभल्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल ही प्रगतीच्या दिशेने चालू आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मकर संक्रात व रथसप्तमीच्या निमित्ताने महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच पुढे बोलताना त्यानी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी राबविलेल्या लेक लाडकी योजना, जनधन योजना, ई श्रम कार्ड योजना, विविध शैक्षणिक व रोजगार निर्मित योजनांचा लाभ घ्यावा. तसेच केंद्र सरकारने राबविलेले ५ लाख पर्यंत मोफत उपचार

(आयुष्यमान कार्ड) शिबिराचे आयोजन केले होते.

तसेच लोकप्रतिनिधी निवडताना (नगरसेवकापासून ते खासदार पर्यंत) मतदान कोणाला करावे याबाबत उपस्थितांना अनमोल असे मार्गदर्शन केले.

 या कार्यक्रमास हजारो महिला उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलाना अल्पोपहार व झाडाची कुंडी, आयुष्यमान कार्ड वाण म्हणून देण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी लहान मुलीपासून ते वयोवृद्ध महिलांनी भारूड, लोकगीते, नृत्य सादर करुन

उपस्थित महिलांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाच्या शेवटी वेताळ पेठ श्रीराम मंदिरास १० कुंड्या भेट म्हणून देण्यात आल्या.  तसेच शिवसेनेच्या ग्राहक सरंक्षण कक्षाच्या जिल्हाप्रमुख पदी ओंकार बसवंती यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा ही सन्मान करण्यात आला.

सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा सेना शहर प्रमुख विशाल गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख नागेश काळे, वरकटणेचे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब तनपुरे, महिला तालुका उपप्रमुख शामल रंदवे, रुपाली शिंदे, मंगल वडे, गीता हेंद्रे आदिनी

अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख आरती बसवंती, महेश चिवटे, युवा सेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, माळशिरस महिला तालुका प्रमुख ज्योती सुरवसे, माढा महिला तालुका प्रमुख संगिता वरपे, शिवसेना तालुका प्रमुख देवानंद बागल, तालुका उपप्रमुख दादा थोरात, जेऊर शहर  प्रमुख  माधव सूर्यवंशी, युवा सेना उप तालुका प्रमुख नवनाथ गुंड, जेष्ठ शिवसैनिक डॉ. बाळासाहेब कारंडे, वैद्यकीय मदत कक्षाचे सहाय्यक नागेश चेंडगे, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

चौकट – महिलांची वाढती गर्दी पाहता शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख आरती बसवंती यांनी बसलेली खुर्ची रिकामी करीत स्वतः उभा राहत येणाऱ्या महिलांना खुर्ची उपलब्ध करुन दिली. त्यामुळे उपस्थित महिलानी आश्चर्य व्यक्त करीत त्यांच्या या कृतीचे कौतुक केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *